advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPLचे भारतीय 'हिरो' WTC Finalमध्ये 'झिरो'; आकडेवारी एकदा बघा

IPLचे भारतीय 'हिरो' WTC Finalमध्ये 'झिरो'; आकडेवारी एकदा बघा

आयपीएल गाजवणाऱ्या भारतीय खेळाडुंना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धावांसाठी धडपडावं लागलं. आयपीएलमध्ये टॉप विकेट घेणारे गोलंदाज ऑस्ट्रेलियान फलंदाजांना रोखू शकले नाहीत.

01
भारताचा कर्णधार रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून खेळताना 16 सामन्यात 332 धावा काढल्या होत्या. यात 2 अर्धशतकांचा समावेश होता. तर WTC फायनलमध्ये मात्र दोन्ही डावात मिळून 58 धावाच करता आल्या.

02
यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा युवा फलंदाज शुभमन गिल WTC फायनलमध्ये सपशेल अपयशी ठरला. त्याने फायनलमध्ये केवळ 31 धावा केल्या. आयपीएलमध्ये 17 डावात ३ शतके, 4 अर्धशतके झळकावताना 890 धावा काढल्या होत्या.

03
आयपीएल न खेळता गेल्या दोन महिन्यांपासून इंग्लंडमध्ये खेळणारा अनुभवी चेतेश्वर पुजाराची कामगिरी धक्कादायक अशी होती. भारताची नवी भिंत अशी ओळख असणारा पुजारा दोन्ही डावात मिळून फक्त 41 धावाच करू शकला.

04
WTC फायनलमध्ये इतरांच्या तुलनेत अजिंक्य रहाणेने समाधानकारक फलंदाजी केली. त्याने दोन्ही डावात 135 धावा केल्या. आयपीएलमध्ये 2 अर्धशतकासह त्याने 11 डावात 326 धावा केल्या होत्या.

05
अष्टपैलू क्रिकेटर रविंद्र जडेजाने आयपीएलमध्ये फलंदाजी करताना 11 डावात 175 धावा केल्या होत्या. तर 16 सामन्यात 20 विकेट घेतल्या. पण WTC फायनलमध्ये पहिल्या डावात 48 तर दुसऱ्या डावात तो शून्यावर बाद झाला. याशिवाय 4 विकेटही घेतल्या.

06
आरसीबीकडून विराट कोहलीने आयपीएलमध्ये १४ सामन्यात ६३९ धावा केल्या होत्या. यात २ शतके, ६ अर्धशतके झळकावली होती. WTC Finalमध्ये त्याला दोन्ही डावात एकूण 63 धावा काढता आल्या.

07
आयपीएल 2023 च्या हंगामात एस भरतला संधी मिळाली नव्हती. तर ऋषभ पंत अपघातामुळे बाहेर पडल्यानंतर त्याची वर्णी WTC फायनलमध्ये लागली. त्याने फायनलमध्ये 27 धावा केल्या.

08
अष्टपैलू क्रिकेटर शार्दुल ठाकुरला आयपीएलमध्ये फारशी चमक दाखवता आली नव्हती. त्याने 10 सामन्यात एका अर्धशतकासह ११३ धावा काढल्या होत्या. तर ७ विकेट घेतल्या होत्या. WTC फायनलमध्ये त्याने पहिल्या डावात अर्धशतक केलं पण दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाला. गोलंदाजी करताना दोन विकेट घेता आल्या.

09
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक असणाऱ्या मोहम्मद शमीने 17 सामन्यात 28 विकेट घेतल्या होत्या. त्याला WTC फायनलच्या सामन्यात दोन्ही डावात मिळून 4 विकेट घेता आल्या.

10
मोहम्मद सिराजनेसुद्धा आयपीएलमध्ये 14 सामन्यात 19 विकेट घेतल्या होत्या. त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दोन डावात एकूण 5 विकेट मिळाल्या.

11
यंदाच्या आयपीएल हंगामात उमेश यादवला फक्त एकच विकेट घेता आली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही त्याला केवळ दोनच विकेट घेता आल्या.

  • FIRST PUBLISHED :
  • भारताचा कर्णधार रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून खेळताना 16 सामन्यात 332 धावा काढल्या होत्या. यात 2 अर्धशतकांचा समावेश होता. तर WTC फायनलमध्ये मात्र दोन्ही डावात मिळून 58 धावाच करता आल्या.

    MORE
    GALLERIES