महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला ७ विकेटने पराभूत करत विजेतेपद पटकावलं.
अंतिम सामन्यात हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने दिल्लीला १३१ धावात रोखलं. त्यानंतर मुंबईने नॅट सीवर ब्रंटच्या अर्धशतकाच्या जोरावर ३ विकेट राखून विजय मिळवला.
मुंबई इंडियन्सची अष्टपैलू क्रिकेट हेली मॅथ्यूजला दोन मोठे पुरस्कार मिळाले. स्पर्धेत सर्वाधिक १६ विकेट घेतल्याबद्दल तिला पर्परल कॅप मिळाली. त्याशिवाय पहिल्या हंगामातील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा पुरस्कारही तिला मिळाला.
दोन्ही पुरस्काराचे प्रत्येकी पाच लाख असे तिला एकूण दहा लाख रुपये मिळाले. पहिल्या राउंडमध्ये ती अनसोल्ड होती. हेलीला फक्त १० लाख रुपयात मुंबईने घेतलं होतं. तिने स्पर्धेत २७१ धावाही केल्या.
मुंबई इंडियन्सला विजेतेपद पटकावताना बक्षीस म्हणून ६ कोटी रुपये मिळाले. तर दिल्ली कॅपिटल्सला ३ कोटी रुपये. सर्वाधिक धावा करणाऱ्या मेग लॅनिंगला पाच लाख रुपये मिळाले.
कॅच ऑफ द सिजनचा पुरस्कार आणि पाच लाख रुपये हरमनप्रीत कौरला मिळाले. तर इमर्जिंग प्लेअर ठरलेल्या यास्तिका भाटियाला पाच लाख रुपये मिळाले.
सोफी डिवाइन पावरफुल स्ट्राइकर ऑफ द सीजन ठरली. तिला 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. तर नताली सीवर ब्रंट अंतिम सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचची मानकरी ठरली. तिला अडीच लाख रुपये मिळाले. याशिवाय पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द मॅच ठरलेल्या राधा यादवला एक लाख रुपये मिळाले.