ग्लॅमरस आहे सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, पाहा टॉप टेन यादी
WPL लिलावानंतर जगातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर्सच्या नावाची चर्चा होत आहे. यात टॉप टेन यादीत ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या महिला क्रिकेटर्सची संख्या समान आहे.
आयसीसी महिला टी२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघ पोहोचला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली आता सेमीफायनलमध्ये कोणाशी लढत होणार हे पाहावं लागेल.
2/ 10
महिला टी२० वर्ल्ड कपवेळी आता जगातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर्सच्या नावाचीही चर्चा आहे. यात टॉप टेन यादीत ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या महिला क्रिकेटर्सची संख्या समान आहे.
3/ 10
ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू क्रिकेटर एलिस पेरी सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर आहे. तिची एकूण संपत्ती १४ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपा ११५ कोटी रुपयांपेक्षा आहे. ती महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबीकडून खेळणार आहे. आरसीबीने १.७ कोटी रुपये मोजून तिला संघात घेतलंय.
4/ 10
सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर्समध्ये दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाच्याच मेग लेनिंगचा नंबर लागतो. तिची एकूण संपत्ती ७४ कोटी रुपयांहून अधिक आहे. महिला आयपीएलमध्ये ती दिल्ली कॅपिटल्सकडून खेळेल. दिल्लीने तिला १.१० कोटी रुपये बोली लावून संघात घेतलंय.
5/ 10
महिला क्रिकेटपटूंमध्ये श्रीमंत खेळाडूंच्या यादीत भारताची माजी कर्णधार मिताली राज ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. मिताली राजची एकूण संपत्ती ४१ कोटी रुपये इतकी आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये मिताली गुजरात जायंट्सची मेंटॉर म्हणून दिसणार आहे.
6/ 10
भारताची स्टार बॅटर स्मृती मानधनाची नेटवर्थ ३३ कोटी रुपयांहून जास्त आहे. WPLमध्ये ती सर्वात महागडी खेळाडू ठरलीय. आरसीबीने ३.४० कोटी रुपयांत तिला संघात घेतलंय.
7/ 10
भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीतची नेटवर्थ २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. WPLमध्ये हरमनप्रीतला स्मृती मानधनापेक्षा कमी रक्कम मिळाली. मुंबईने तिला १.८० कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतलंय
8/ 10
सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर्समध्ये इंग्लंडची सारा टेलर सहाव्या क्रमांकावर आहे. तिची मालमत्ता १६ कोटी रुपये आहे.
9/ 10
सातव्या आणि आठव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची हॉली फर्लिंग आणि इंग्लंडची इसा गुहा ही आहे. दोघींची नेटवर्थ १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे
10/ 10
पाकिस्तानची माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटर सना मीरने ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केलीय. तर दक्षिण आफ्रिकेच्या डेन वानने आतापर्यंत ८ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.