उपांत्य सामन्यात माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याला पराभूत करून शिवराज राक्षेने फायनलमध्ये धडक मारली होती.
महाराष्ट्र केसरीसाठी झालेल्या अंतिम लढतीत शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला चीतपट केलं.
शिवराज राक्षे हा मूळचा राजगुरुनगरच्या राक्षेवाडीचा असून त्याला कुस्तीचं बाळकडून घरातच मिळालं होतं.
वडील शेतकरी आहेत आणि घरचा दुधाचा व्यवसाय असल्याचं शिवराजने अंतिम सामन्याआधी बोलताना सांगितलं होतं.
लहानपणापासूनच कुस्तीचे धडे गिरवले. वडील आणि आजोबा पैलवान होते. त्यांचाच वारसा मी चालवत असल्याचं शिवराजने सांगितलं.
वडिलांची इच्छा होती की मुलाने महाराष्ट्र केसरी व्हाव अशी भावना शिवराजने उपांत्यपूर्व फेरी जिंकल्यानंतर म्हटलं होतं.