टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा फॉर्मात यावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. आगामी आशिया चषकात विराटकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. महत्वाचं म्हणजे आशिया चषक विराटसाठी लकी आहे.
आशिया चषकात विराटनं आतापर्यंत 16 सामन्यात 766 धावा ठोकल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत तो सचिन आणि रोहितनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
विराटनं आशिया चषकात तीन शतकं आणि दोन अर्धशतकं झळकावली आहेत. 2012 साली पाकिस्तानविरुद्ध केलेली 183 धावांची खेळी ही आशिया चषकातली आणि विराटची वन डेतली सर्वोत्तम खेळी.
आशिया चषकात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार पटकावण्याचा मान विराटकडेच आहे. त्यानं आतापर्यंत पाच वेळा सामनावीराचा बहुमान मिळवलाय.
2018 सालच्या आशिया चषकातून विराटनं माघार घेतली होती. पण यंदा विराटला आशिया चषक संघात स्थान देण्यात आलं आहे. आगामी टी20 विश्वचषकाआधी विराटसाठी ही एक मोठी संधी ठरावी