भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली त्याच्या फलंदाजीमुळे रनमशिन म्हणून ओळखला जातो. क्रिकेटर असलेला विराट कोहली हा एक स्पोर्ट पर्सनालिटीही आहे. विराट अनेक कंपन्यांचा ब्रांड एंबेसडर आहे. त्याची संपत्ती कोट्यवधींची असून एकापेक्षा एक महागड्या कारही त्याच्या ताफ्यात आहेत.
बीसीसीआयकडून विराट कोहलीला वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात. याशिवाय एक कसोटी खेळल्यास 15 लाख, एका वनडेसाठी 6 लाख तर टी20 खेळल्यास 3 लाख रुपये दिले जातात. टी20 लीगमधून विराट दरवर्षी 15 कोटी रुपये कमावतो. त्याची नेटवर्थ 1 हजार कोटींहून जास्त आहे.
विराट कोहली सोशल मीडियावर पोस्टमधूनही कोट्यवधी रुपये कमावतो. इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी तो 8.9 कोटी रुपये घेतो. तर ट्विटरसाठी अडीच कोटी रुपये घेतो. मुंबईत विराट कोहलीची प्रॉपर्टी 34 कोटी रुपयांची तर गुरुग्राममध्ये ८० कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे.
विराटच्या ताफ्यात आलिशान कार असून त्यात ऑडी, फॉर्च्यूनर, रेंज रोव्हर गाड्यांचा समावेश आहे. ऑडीच्या आर 8 वी10 प्लस, आर 8 एलएमएक्स, ए8 एल, क्यू 8, क्यू 7, आरएस 5 आणि एस 5 कार त्याच्याकडे आहेत.
ब्रांड एंडोर्समेंटमध्ये विराट व्हिवो, मिंत्रा, ग्रेट लर्निंग, रोगन, नॉइस, लक्सर, टुथसी, उबर या कंपन्यांसोबत काम करतो. यातून त्याला मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात.