advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / केएल राहुलनंतर विराटचा नंबर? गेल्या 15 डावात रनमशिनला ब्रेक

केएल राहुलनंतर विराटचा नंबर? गेल्या 15 डावात रनमशिनला ब्रेक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा कसोटीत बॅडपॅच सुरू आहे. ऑस्ट्रेलियात तिसऱ्या कसोटीत दोन्ही डावात अपयशी झालेल्या विराटला गेल्या १५ डावात फारशी चमक दाखवता आलेली नाही. खराब फॉर्ममुळे केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर आता विराटबाबत बीसीसीआय़ मोठं पाऊल उचलणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

01
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. मात्र त्याला आतापर्यंत तीन सामन्यात एक अर्धशतकही करता आलेलं नाही. विराट कोहलीने ४४ धावांची केलेली खेळी मोठी ठरली. यानंतर सलग तीन डावात त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलंय.

02
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यात खराब कामगिरीमुळे सलामीवीर केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. गेल्या दहा कसोटी डावात त्याला धावा करता आलेल्या नव्हत्या. विराट कोहलीने गेल्या १५ कसोटी डावात मोठी धावसंख्या केलेली नाही. फक्त दोन डावात त्याला ४० पेक्षा जास्त धावा करता आल्यात. तर १५ डावात मिळून २९७ धावाच झाल्या आहेत.

03
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेत विराटला जास्ती जास्त एका डावात ४४ धावाच करता आल्या. नागपूरमध्ये पहिल्या डावात १२ धावा केल्या होत्या. तर दिल्लीत पहिल्या डावात ४४ आणि दुसऱ्या डावात २२ धावा केल्या होत्या. इंदौर कसोटीतील पहिल्या डावात २२ आणि दुसऱ्या डावात १३ धावा केल्या.

04
विराटच्या संघातील स्थानाला काही धोका नसला तरी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यासमोर संघाला विजय मिळवून देण्याचं आव्हान आहे. जर वरिष्ठ खेळाडूंकडून धावा होत नसतील तर बाहेर बसलेल्या खेळाडूंनी संधी दिली जाते. केएल राहुल वरिष्ठ खेळाडू असूनही फ्लॉप झाल्यानं त्याच्या जागी शुभमन गिलला संधी दिली गेली.

05
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आहेत त्यांनी पदभार स्वीकारताच म्हटलं होतं की, क्रिकेटमध्ये मोठे निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. त्यामुळे विराट कोहलीसोबत बीसीसीआय बोलू शकते. त्याच्या योजनेबाबत चर्चा होईल आणि त्याला पुरेसा वेळही दिला जाईल. याआधीही वरिष्ठ खेळाडूंसोबतही असं झालं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. मात्र त्याला आतापर्यंत तीन सामन्यात एक अर्धशतकही करता आलेलं नाही. विराट कोहलीने ४४ धावांची केलेली खेळी मोठी ठरली. यानंतर सलग तीन डावात त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलंय.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement