आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्सच्या टीमचा लागोपाठ दोन सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. यासोबत शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या टीमसाठी पुढचा रस्ता कठीण होत चालला आहे. 10 टीमच्या या स्पर्धेचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे आणि प्ले-ऑफमध्ये फक्त चार टीमच पोहोचू शकणार आहेत.
क्रिस गेलनं पंजाबकडून खेळताना धमाका केला होता, पण आता गेलने निवृत्ती घेतली आहे. गेल आता कॉमेंटेटर म्हणून स्पर्धेत सहभागी होत आहे. गेलसोबत फोटोमध्ये दिसणारा मुलगा आता 24 वर्षांचा झाला आहे.
इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करन पंजाब किंग्सकडून आयपीएल खेळतो आहे. आयपीएल 2023 च्या लिलावामध्ये सॅम करन सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. करनला पंजाब किंग्सने 18.50 कोटी रुपये खर्च करून विकत घेतलं. (Sam Curran/Instagram)
सॅम करनची गर्लफ्रेंड इसाबेला सायमंड्स विलमॉट क्युट आणि बोल्ड आहे. सॅम करन आणि इसाबेला मागच्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. करनची गर्लफ्रेंड सोशल मीडिया इनफ्लुएन्सरही आणि अभिनेत्रीही आहे. (Sam Curran/Instagram)
इसाबेलाला संगीत, थिएटर आणि डान्सचाही छंद आहे. तसंच आपण लेखक असल्याचंही इसाबेला सांगते, तसंच ती डिझायनरही आहे. काही वर्षांपूर्वी एका पार्टीमध्ये सॅम करन आणि इसाबेला यांची भेट झाली होती. (Sam Curran/Instagram)
कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून एका कार्यक्रमात हे दोघं एकमेकांना भेटले होते. पहिल्या भेटीमध्येच सॅम करनचा इसाबेलावर जीव जडला. यानंतर त्यांनी एकमेकांचे फोन नंबर एक्सचेंज केले, यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली. सॅम करन आणि इसाबेला त्यांच्या नात्याबाबत खुलून बोलतात, एवढच नाही तर ते सोशल मीडियावर फोटोही शेअर करतात. (Sam Curran/Instagram)
सॅम करनने आयपीएलच्या या मोसमात 11 मॅचच्या 10 इनिंगमध्ये एका अर्धशतकाच्या मदतीने 196 न केल्या. करनने 24.50 ची सरासरी आणि 137 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे. बॉलिंगमध्ये मात्र करन अपयशी ठरला. 11 सामन्यांमध्ये करनने फक्त 7 विकेट घेतल्या, यात त्याचा इकोनॉमी रेटही 10.28 चा आहे. (Sam Curran/Instagram)