Saina Nehwal Birthday : मुलगी झाल्यानं आजीने पाहिला नव्हता चेहरा, मोठी होऊन बनली चॅम्पियन
स्त्रीला शक्तीचं रूप मानलं जात असलं तरी आजही अनेकदा वंशाचा दिवा हवा अशी मानसिकता समाजात दिसून येते. सायनाचा जन्म झाला तेव्हा तिच्या आजीने एक महिना तिचा चेहरा पाहिला नव्हता.
भारताची बॅडमिंटन प्लेअर सायना नेहवालचा आज वाढदिवस आहे. हरयाणातील हिसार जिल्ह्यात सायनाचा १७ मे १९९० रोजी जन्म झाला.
2/ 7
स्त्रीला शक्तीचं रूप मानलं जात असलं तरी आजही अनेकदा वंशाचा दिवा हवा अशी मानसिकता समाजात दिसून येते. सायनाचा जन्म झाला तेव्हा तिच्या आजीने एक महिना तिचा चेहरा पाहिला नव्हता.
3/ 7
सायनाच्या आजीला घरात नातू जन्मावा असं वाटत होतं. तरी सायनाची आई नेहमी तिच्या पाठीशी उभा राहिली. कुटुंबियांसह समाजातून प्रतिकूल वागणूक मिळाली तरी आपल्या मुलीला उषा नेहवाल यांनी चॅम्पियन केलं.
4/ 7
सायनाची आई उषा यासुद्धा बॅडमिंटन प्लेअर होत्या. राज्य स्तरावर स्पर्धांमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. सायनाला कराटेमध्ये करिअर करायचं होतं. मात्र तिने पुढे आईच्याच पावलावर पाऊल टाकलं. वयाच्या आठव्या वर्षी तिने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली होती.
5/ 7
बॅडमिंटनचं सुरुवातीचं ट्रेनिंग हिसारमध्ये घेतल्यानंतर सायनाने हैदराबादमध्ये धडे गिरवले. २००९ मध्ये सायनाने इंडोनेशिया ओपन सुपर सीरीज बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू होती.
6/ 7
२०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने महिला एकेरीत ब्राँड पटकावलं होतं. ऑलिम्पिकमध्येही पदक जिंकणारी ती पहिली महिला बॅडमिंटन प्लेअर होती.
7/ 7
२०१० आणि २०१८ मध्ये सायनाने कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला एकेरीत सुवर्णपदक पटकावलं होतं. तर २०१८ मध्ये मिश्र दुहेरीत सुवर्ण पदकावर नाव कोरलं होतं.