गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात सलग पाच षटकार मारून केकेआरच्या रिंकू सिंगने संघाला अविश्वसनीय असा विजय मिळवून दिला. रिंकू हा केकेआरचा पहिला असा फलंदाज आहे ज्याने आय़पीएलमध्ये अखेरच्या षटकात पाच षटकार मारले. आय़पीएलच्या इतिहासात तो पहिला असा फलंदाज आहे ज्याने अखेरच्या षटकात पाच षटकार मारले. आय़पीएलमध्ये सलग सात चेंडूत ४० धावा करणाराही तो पहिलाच फलंदाज ठरलाय. धावांचा पाठलाग करताना अखेरच्या षटकात सर्वाधिक ३० धावा करणारा रिंकू पहिलाच फलंदाज ठरला आहे. अखेरच्या षटकात २९ धावांची गरज असताना विजय मिळवून देण्याचा विक्रम रिंकुने केला.