advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / World Cup : बुमराहचं कमबॅक कधी? वर्ल्ड कपचं वेळापत्रक येताच आली मोठी अपडेट

World Cup : बुमराहचं कमबॅक कधी? वर्ल्ड कपचं वेळापत्रक येताच आली मोठी अपडेट

Jasprit Bumrah Fitness Updates: टीम इंडियाचा अनुभवी फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. वर्ल्ड कप वेळापत्रकाची घोषणा झाल्यानंतर मंगळवारी बुमराहच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. बुमराह सध्या एनसीएमध्ये आहे. यावर्षी मार्च महिन्यात बुमराहवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, तेव्हापासून तो क्रिकेटपासून लांब आहे.

01
जसप्रीत बुमराहने नेटमध्ये सरावाला सुरूवात केली आहे. एनसीएमध्ये सरावादरम्यान बुमराहने 7 ओव्हर बॉलिंग केली, पण दुखापतीतून बाहेर येत असलेला बुमराह पुनरागमन कधी करणार? याबाबत अजूनही काहीही स्पष्टता आलेली नाही. बुमराहची नेटमधली बॉलिंग वनडे वर्ल्ड कपची प्रतिक्षा करणाऱ्या टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी दिलासा म्हणावा लागेल. वारंवार होणाऱ्या पाठीच्या दुखापतीमुळे बुमराहवर मार्च महिन्यात न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून बुमराह टीमबाहेर आहे.

02
बुमराहच्या फिटनेसवर लक्ष ठेवणाऱ्या सूत्राने त्याच्या फिटनेसबद्दल माहिती दिली. अशाप्रकारच्या दुखापतीवर कोणतीही निश्चित वेळ ठरवू शकत नाही, पण तो दुखापतीमधून चांगल्याप्रकारे बाहेर येत आहे. एनसीएमध्ये त्याने 7 ओव्हर बॉलिंग केली. बुमराह त्याचा कार्यभार वाढवत आहे, ज्यामध्ये सुरूवातीला छोटा वर्कआऊट ते बॉलिंग करणं या गोष्टींचा समावेश आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

03
बुमराह पुढच्या महिन्यात एनसीएमध्ये काही सराव सामने खेळेल, तेव्हा त्याच्या फिटनेसची समिक्षा केली जाणार आहे. बुमराहच्या पुनरागमनबद्दल सावधानता बाळगणं गरजेचं आहे, असं टीम इंडियाचे माजी स्ट्रेन्थ ऍण्ड कंडिशनिंग कोच रामजी श्रीनिवासन यांनी सांगितलं.

04
बुमराहला बॉलिंग करण्याची कोणतीही घाई नाही. एनसीएमध्ये सराव सामना खेळणं चांगलं पाऊल आहे, कारण यामुळे बुमराहचं शरीर मॅच खेळण्यासाठी तयार व्हायला मदत होईल. बुमराहने आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याआधी काही स्थानिक सामने खेळले पाहिजेत, असं मतही सूत्राने व्यक्त केलं.

05
दुसरीकडे केएल राहुल आणि श्रेयस अय्यरही एनसीएमध्ये दुखापतीवर उपचार घेत आहेत. या दोघांची दुखापतही बरी होत आहे. बुमराहप्रमाणेच राहुल आणि श्रेयस यांच्या पुनरागमनाची वेळही निश्चित नाही. राहुलवर लंडनमध्ये जांघेची तर श्रेयसची पाठीच्या खालच्या भागाची सर्जरी करण्यात आली होती.

  • FIRST PUBLISHED :
  • जसप्रीत बुमराहने नेटमध्ये सरावाला सुरूवात केली आहे. एनसीएमध्ये सरावादरम्यान बुमराहने 7 ओव्हर बॉलिंग केली, पण दुखापतीतून बाहेर येत असलेला बुमराह पुनरागमन कधी करणार? याबाबत अजूनही काहीही स्पष्टता आलेली नाही. बुमराहची नेटमधली बॉलिंग वनडे वर्ल्ड कपची प्रतिक्षा करणाऱ्या टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी दिलासा म्हणावा लागेल. वारंवार होणाऱ्या पाठीच्या दुखापतीमुळे बुमराहवर मार्च महिन्यात न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून बुमराह टीमबाहेर आहे.

    MORE
    GALLERIES