युएइमध्ये आयपीएल खेळत असलेल्या सुनील नारायणनं बाबा होणार असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत सुनील नारायणनं ही बातमी दिली.
सुनीलची पत्नी नंदिता कुमार प्रेग्नेंट असून स्वत: सुनीलनेही हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली.
सुनीलने पत्नी नंदितासोबत एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो मुलाचा बॉडी सूट परिधान केलेला दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये, हल्ली छोट्या पॅकेटची डिलिव्हरी मोठ्या पॅकेटमध्ये होते, असे लिहिले आहे.
काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या संशयित बॉलिंग अॅक्शन कमिटीने सुनील नारायणच्या गोलंदाजीला क्लीन चिट दिली होती. 10 ऑक्टोबरला किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात सुनील नरेनच्या गोलंदाजीविरुद्ध तक्रार करण्यात आली होती.