भारताच्या महिला टीमची क्रिकेटपटू शफाली वर्माने आपल्या नावावर नवा विक्रम केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शफालीला टीममध्ये स्थान मिळालं. 17 वर्ष आणि 150 दिवसांची असताना शफालीने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये देशाचं प्रतिनिधीत्व केलं. या वयात क्रिकेटचे तिन्ही फॉरमॅट खेळणारी ती पहिली भारतीय क्रिकेटपटू आहे. महिलाच नाही तर पुरुष क्रिकेटपटूंनाही ही कामगिरी करता आली नाही. (Shafali Verma/Instagram)
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) 1989 साली 16 वर्षांचा असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, पण त्याने पहिली टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच 2006 साली खेळली. सचिनने त्याच्या करियरमध्ये फक्त एकच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या एकमेव सामन्यात तो 10 रन करून आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या सामन्यात सचिनला एक विकेटही मिळाली होती. (Shafali Verma/Instagram)
शफाली वर्माला काहीच दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. दोन्ही इनिंगमध्ये तिने अर्धशतक करून स्वत:ला सिद्ध केलं. यानंतर पहिल्या वनडेमध्ये शफाली 14 बॉलमध्ये 15 रन करून आऊट झाली. तिने 22 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 29 च्या सरासरीने 617 रन केले, यात तिचा स्ट्राईक रेट 148 आहे, तसंच तीन अर्धशतकंही आहेत. (Shafali Verma/Instagram)
शेफालीच्या आधी महिला क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या सारा टेलरने 17 वर्ष आणि 86 दिवसांची असताना आणि ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीने 17 वर्ष 104 दिवसांची असताना तिन्ही फॉरमॅट खेळले होते. महिला आणि पुरुषांमध्ये अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान पहिल्या क्रमांकावर आहे. मुजीबने 17 वर्ष आणि 78 दिवसांचा असताना क्रिकेटचे तिन्ही फॉरमॅट खेळले. (Shafali Verma/Instagram)