Shafali Verma (c) भारताच्या महिला क्रिकेट संघात खेळणाऱ्या शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली अंडर १९ महिला संघाने पहिल्या वहिल्या वर्ल्ड कपवर नाव कोरलं. शफाली वर्माने अंतिम सामन्यात एक विकेट घेतली, मात्र तिला फलंदाजीत मोठी खेळी करण्यात अपयश आलं.
Shweta Sehrawat : सेमीफायनलमध्ये श्वेता सेहरावतच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने विजय मिळवला होता. पण फायनलमध्ये तिला फक्त ५ धावाच काढता आल्या.
Soumya Tiwari : शफाली वर्मा आणि श्वेता बाद झाल्यानंतर सौम्या तिवारीने त्रिशासोबत मिळून डाव सावरला. तिने नाबाद २४ धावा केल्या.
Gongadi Trisha : सौम्या तिवारीसोबत त्रिशाने ४६ धावांची भागिदारी केली. त्रिशाने २९ चेंडूत २४ धावा काढल्या.
Richa Ghosh (wk) : यष्टीरक्षक रिचा घोषने इंग्लंडच्या हॅना बेकरला शून्यावर यष्टीचित केलं. शफाली वर्माच्या गोलंदाजीवर चपळाई दाखवत रिचाने बेकरला बाद केलं.
Hrishita Basu : हर्षिता बसूने सेमीफायनलमध्ये क्षेत्ररक्षणात जबरदस्त कामगिरी केली होती. अंतिम सामन्यात फलंदाजी करताना एकच चेंडू खेळायला मिळाला.
Parshavi Chopra : सेमीफायनलमध्ये ३ विकेट घेणाऱ्या पार्शवीने या फायनलमध्येही १३ धावात २ विकेट घेतल्या.
Sonam Yadav : सोनमने १.१ ओव्हर टाकताना ३ धावा देत एक विकेट घेतली. तिने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत अखेरचा गडी बाद केला.