भारतीय क्रिकेट संघाला २०१४ पासून आतापर्यंत आयसीसीच्या एकाही स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद पटकावता आलेलं नाही. सेमीफायनल आणि फायनलमध्ये पोहोचल्यानंतरही विजेतेपदाने हुलकावणी दिलीय.
पुरुषांच्या टी२० वर्ल्ड कप २०१४ मध्ये भारतीय संघाला श्रीलंकेने पराभूत केलं होतं. भारताने दिलेलं १३० धावांचं आव्हान श्रीलंकेने १८ षटकात पूर्ण केलं होतं.
2015मध्ये वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती. ऑस्ट्रेलियाने दिलेलं ३२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ २३३ धावाच करू शकला होता.
2016च्या पुरुषांच्या टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताला सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजकडून पराभूत व्हावं लागलं होतं.
2015मध्ये वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती. ऑस्ट्रेलियाने दिलेलं ३२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ २३३ धावाच करू शकला होता.
2017 च्या महिला क्रिकेट वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. इंग्लंडने त्या सामन्यात ९ धावांनी विजय मिळवला होता.
2018 आयसीसी महिला टी२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभूत व्हावं लागलं होतं. इंग्लंडने ८ गडी आणि १७ चेंडू राखून सामना जिंकला होता.
2019च्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडकडून सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. महेंद्र सिंह धोनीचा तो अखेरचा सामना ठरला.
भारतीय महिला संघाने २०२० च्या महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र इंग्लंडने उभारलेल्या १८४ धावांच्या आव्हानासमोर भारत ९९ धावात गारद झाला होता.
२०२१ मध्ये पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला होता. न्यूझीलंडने ८ धावांनी सामना जिंकत WTCचे विजेतेपद पटकावले होते.
कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्येही भारताच्या महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. ऑस्ट्रेलियाने ९ धावांनी सामना जिंकला होता.
पुरुष टी२० वर्ल्ड कप २०२२ च्या सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून पराभवाचा धक्का बसला होता. भारताने दिलेलं १६९ धावांचं आव्हान इंग्लंडच्या सलामीच्या जोडीनेच पूर्ण केलं होतं.