बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा सामना आजपासून सुरू झालाय. या सामन्यात भारताने मोहम्मद शमीच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादवला संधी दिलीय. उमेश यादवच्या वडिलांचे गेल्याच आठवड्यात निधन झाले. त्यांच्या निधनाचे दु:ख बाजूला सारत उमेश यादव टीम इंडियासाठी मैदानात उतरला आहे. उमेश यादवच्या आधीही अनेक खेळाडूंनी वडिलांच्या निधनानंतर खेळण्याचा निर्णय घेतला होता.
भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. यात केएल राहुलला ड्रॉप करण्यात आलंय तर त्याच्या जागी शुभमन गिलला संघात घेतलं आहे. याशिवाय मोहम्मद शमीच्या जागी उमेश यादवला संधी दिली आहे. त्याला सुरुवातीच्या दोन सामन्यात संधी मिळाली नव्हती.
उमेश यादवच्या वडिलांचे गेल्याच आठवड्यात निधन झाले होते. त्यामुळे तो घरी परतेल असं म्हटलं जात होतं. पण तो भारतीय संघासोबत सरावासाठी पोहोचला आणि त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थानही मिळालं.
उमेश यादवच्या आधी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही त्याच्या वडिलांच्या निधनानंतर खेळला होता. २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना वडिलांच्या निधनाची बातमी त्याला मिळाली होती. मात्र घरी न जाता त्याने टीम इंडियाकडून खेळण्याचा निर्णय घेतला.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली १७ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. विराट कोहली दिल्लीकडून कर्नाटकविरोधात रणजी ट्रॉफीत खेळत होता. त्यावेळी वडिलांच्या निधनानंतर त्याने दुसऱ्याच दिवशी फलंदाजीला मैदानात उतरला होता. तसंच दिवसभराचा खेळ संपल्यानंतर तो अंत्यसंस्कारासाठी गेला होता.