दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या आय़सीसी टी२० महिला वर्ल्ड कपमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्ध भारताला पराभूत व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाने ४ बाद १७२ धावा केल्या होत्या. याचा पाठलाग करताना भारताला ८ बाद १६७ धावांपर्यंतच मजल मारता आली.
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि सध्याची महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या वर्ल्ड कपमधील धावबाद होण्यात बरेचसे साम्य दिसून आले. दोघांचाही जर्सी नंबर ७ आहे.
२०१९ च्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धोनी धावबाद झाला होता आणि इथेही हरमनप्रीत टी२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धावबाद झाली.
धोनी आणि हरमनप्रीत संघाचं नेतृत्व करताना सेमीफायनलमध्ये बाद झाले. धावांचा पाठलाग करत असताना दोघेही बाद झाले आणि संघाच्या विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या. दुर्देवाने महेंद्र सिंह धोनीचा तो अखेरचा सामना ठरला होता.