advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Cheteshwar Pujara : पुजाराचं करिअर संपलं? तिसऱ्या क्रमांकासाठी दोन खेळाडूंमध्ये रेस!

Cheteshwar Pujara : पुजाराचं करिअर संपलं? तिसऱ्या क्रमांकासाठी दोन खेळाडूंमध्ये रेस!

Cheteshwar Pujara Dropped: टीम इंडियाची नवी भिंत म्हणून ओळख मिळवलेल्या चेतेश्वर पुजाराला वेस्ट इंडिज दौऱ्यातून डच्चू देण्यात आला आहे. कामगिरीमध्ये सातत्य नसल्यामुळे पुजाराला टीममधून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे पुजाराचं आंतरराष्ट्रीय करिअर आता संपलं का? असा प्रश्न विचारला जात आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत.

01
    चेतेश्वर पुजारासाठी आता भारतीय टीममध्ये पुनरागमन करणं मुश्किल आहे. पुजाराला अजिंक्य रहाणेसोबत श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून बाहेर केलं होतं, तेव्हा निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी तिसऱ्या क्रमांकासाठीचे दरवाजे त्याच्यासाठी बंद झाले नाहीत, प्रथम श्रेणी क्रिकेट खेळून तो पुनरागमन करू शकतो, असं सांगितलं होतं.

02
यानंतर पुजारा काऊंटी क्रिकेटमध्ये ससेक्सकडून खेळला आणि त्याने रनचा डोंगर उभारला, त्यामुळे इंग्लंडमधल्या 2022 च्या एकमेव टेस्टमध्ये पुजाराची टीम इंडियामध्ये निवड झाली. त्याच वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुजाराने 100 टेस्ट मॅच खेळण्याचा विक्रमही केला.  (Instagram)

03
ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सीरिजमध्ये पुजारा अपयशी ठरला, त्यामुळे त्याच्याकडे कमी संधी शिल्लक होत्या. निवड समिती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलआधी टीम इंडियात कोणतेही बदल करायला तयार नव्हती, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं. (Instagram)

04
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दोन्ही इनिंगमध्ये पुजारा अत्यंत खराब शॉट मारून आऊट झाला, यानंतर निवड समितीने त्याच्याबद्दलचा निर्णय निश्चित केला. निवड समिती सदस्य तेव्हा इंग्लंडमध्येच होते त्यामुळे त्यांनी नक्कीच कोच राहुल द्रविडसोबत चर्चा केली असेल, असंही बोर्डाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.(Instagram)

05
पुजाराने बांगलादेशविरुद्ध 90 आणि 102 रनची खेळी केली, पण हे वगळता मागच्या तीन वर्षांमध्ये पुजाराची सरासरी फक्त 26 ची होती. मागच्या बऱ्याच काळापासून पुजारा संघर्ष करताना दिसत आहे. (Instagram)

06
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची सायकल दोन वर्षांची आहे आणि पुजारा तीन वर्षांपासून रन करत नाहीये. कोहलीही रन करत नव्हता पण तो कधीच फॉर्मबाहेर नसल्याचं दिसत नव्हतं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुजाराबाबत आत्मविश्वास वाटत नव्हता, यानंतर बांगलादेशविरुद्धच्या दोन इनिंग जास्त महत्त्वाच्या नव्हत्या, असंही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं. वेस्ट इंडिज दौऱ्यात तिसऱ्या क्रमांकासाठी यशस्वी जयस्वाल किंवा ऋतुराज गायकवाडला संधी दिली जाऊ शकते.  (Instagram)

07
चेतेश्वर पुजाराच्या मागच्या 5 वर्षांच्या करिअरवर नजर टाकली तर त्याने 2019 साली 8 सामन्यांमध्ये 507 रन केले, तर 2020 साली त्याला 4 टेस्टमध्ये 163 रन करता आले. 2021 साली त्याने 14 टेस्टमध्ये 702 रन तर 2022 साली 5 टेस्टमध्ये 409 रन केले. यावर्षी म्हणजेच 2023 साली त्याला 5 टेस्टमध्ये 181 रन करता आले.  (Instagram)

  • FIRST PUBLISHED :
  •     चेतेश्वर पुजारासाठी आता भारतीय टीममध्ये पुनरागमन करणं मुश्किल आहे. पुजाराला अजिंक्य रहाणेसोबत श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून बाहेर केलं होतं, तेव्हा निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी तिसऱ्या क्रमांकासाठीचे दरवाजे त्याच्यासाठी बंद झाले नाहीत, प्रथम श्रेणी क्रिकेट खेळून तो पुनरागमन करू शकतो, असं सांगितलं होतं.

    MORE
    GALLERIES