advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / बांगलादेशचा कसोटी क्रिकेटमध्ये महारेकॉर्ड, 112 वर्षे जुना विक्रम मोडला

बांगलादेशचा कसोटी क्रिकेटमध्ये महारेकॉर्ड, 112 वर्षे जुना विक्रम मोडला

Biggest Test Victory 21st Centyr in Test: बांगलादेशने एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा दारुण पराभव केला. या सामन्यात धावांच्या फरकाने बांगलादेशने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला तिसरा सर्वात मोठा विजय मिळवला.

01
 बांगलादेशने अफगाणिस्तानला 662 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 33 षटकात 115 धावाच करू शकला. दुसऱ्या डावात त्यांच्याकडून सर्वाधिक 30 धावा रहमत शाहने काढल्या. फक्त तीन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात टस्किन अहमदने सर्वाधिक चार गडी बाद केले. तर शोरिफुल इस्लामने 3 विकेट घेतल्या.

02
कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या फरकाने हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे. या यादीत अव्वल स्थानी इंग्लंड आहे. इंग्लंडने 1928 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 675 धावांनी विजय मिळवला होता. तर ऑस्ट्रेलियाने १९३४मध्ये इंग्लंडविरुद्ध 562 धावांनी कसोटी जिंकली होती.

03
बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा 112 वर्षे जुना विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाने 1911 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 530 धावांनी विजय मिळवला होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला हा तिसरा सर्वात मोठा विजय होता. आता तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेशने बाजी मारली.

04
बांगलादेशच्या नजमुल हुसैनं शंटोने दोन्ही डावात शतक झळकावलं. त्याने पहिल्या डावात 146 तर दुसऱ्या डावात 124 धावा केल्या. मोमिनुल हकनंतर कसोटी क्रिकेटच्या दोन्ही डावात शतक करणारा तो बांगलादेशचा दुसरा फलंदाज ठरला.

05
बांगलादेशने याआधी सर्वात मोठा विजय २००५ मध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध मिळवला होता. झिम्बॉब्वेला २२६ धावांनी हरवलं होतं. आज अफगाणिस्तानच्या डावाची सुरुवात २ बाद ४५ वरून झाली. तिसऱ्याच षटकात इबादत हुसैन बाद झाला.

06
रहमत शाह एका बाजुने किल्ला लढवत होता तर दुसऱ्या बाजुला शरीफुल इस्लामने अफसर जजाई, बाहिर शाह यांना बाद केलं. कर्णधार हशतुल्लाह शाहिदीच्या जागेवर बाहिर शाह फलंदाजीला आला. हशमतुल्लाह टस्किनच्या गोलंदाजीवर जखमी होऊन रिटायर हर्ट झाला होता. रहमतला बाद केल्यानंतर करीम जन्नत आणि यामिन अहमदजई यांनाही टस्किनने बाद केलं.

07
 बांगलादेशने पहिल्या डावात 382 धावा केल्या होत्या. तर अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात १४६ धावाच करू शकला. त्यानतंर दुसऱ्या डावात बांगलादेशने ४२५ धावा करून डाव घोषित केला आणि अफगाणिस्तानला अशक्यप्राय असं ६६२ धावांचे आव्हान दिले.

  • FIRST PUBLISHED :
  •  बांगलादेशने अफगाणिस्तानला 662 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 33 षटकात 115 धावाच करू शकला. दुसऱ्या डावात त्यांच्याकडून सर्वाधिक 30 धावा रहमत शाहने काढल्या. फक्त तीन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात टस्किन अहमदने सर्वाधिक चार गडी बाद केले. तर शोरिफुल इस्लामने 3 विकेट घेतल्या.

    MORE
    GALLERIES