भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलनंतर आता अष्टपैलू क्रिकेटर अक्षर पटेलसुद्धा लग्नबंधनात अडकणार आहे. अक्षर आणि मेहा २६ जानेवारी रोजी लग्न करणार आहेत. अक्षर आणि मेहा यांचा मेहंदीचा कार्यक्रम २५ जानेवारी रोजी पार पडला. गुजराती रीति रिवाजानुसार वडोदरा इथं त्यांचे लग्न होणार आहे. अक्षर आणि मेहा हे एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतात. मेहा ही डायटिशियन आणि न्यूट्रिनिस्ट आहे. मेहा पटेलचं प्राण्यांवर विशेषत: कुत्र्यांवर प्रेम जास्त आहे. तिच्या सोशल मीडियावर गुच्ची नावाच्या कुत्र्यासोबतचे अनेक फोटो आहेत. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मेहाला फिरायलासुद्धा आवडतं. भारतासह परदेशात अनेक ठिकाणचे फोटो तिने शेअर केले आहेत. अक्षर पटेलने फिल्मी स्टाइलमध्ये वाढदिवशी तिला प्रपोज केलं होतं. दोघांनी २० जानेवारी २०२२ ला साखरपुडा केला होता.