कतारमध्ये फिफा वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. यावेळी हा सर्वात मोठा फुटबॉल मेळा कतारच्या 8 स्टेडियममधील सामन्यांद्वारे जगभरातील टीव्ही स्क्रीनसमोर बसलेल्या लोकांपर्यंत पोहोचेल. या वर्ल्ड कपसाठी किती स्टेडियम बांधले गेले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? त्यापैकी एक स्टेडियम फक्त जहाजांमध्ये पाठवल्या जाणार्या कंटेनरपासून उभारलं आहे. फिफाच्या इतिहासात अशा प्रकारचे स्टेडियम प्रथमच बांधण्यात आले आहे. पण, आता असे स्टेडियम भविष्यात नक्कीच पाहायला मिळतील. कारण कतारमधील या स्टेडियमने एक नवीन पाया घातला आहे. (डी झीन)
या स्टेडियममध्ये 974 रिसायकल कंटेनर वापरण्यात आले आहेत. त्याची रचना फेनविक इरिबेरेन यांनी तयार केली होती. यामध्ये केवळ या कंटेनरचा वापर करण्यात आला आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की या कंटेनरच्या मदतीने अनेक देशांमध्ये स्टायलिश घरे बांधली जात आहेत. मात्र, याद्वारे एक विशाल स्टेडियम उभारले जाईल, ही निश्चितच एक अनोखी गोष्ट आहे. हे स्टेडियम दोहामधील रास अबू आबाद नावाच्या ठिकाणी बांधले गेले आहे. हे तात्पुरते स्टेडियम आहे. (डी झीन)
वास्तविक वर्ल्ड कप संपताच हे स्टेडियमही संपणार आहे. त्याचे भाग काढले जातील. कंटेनर वेगळे केले जातील. त्यानंतर ते दोहाहून उरुग्वेला नेले जाईल, जिथे त्याचे 2030 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी स्टेडियममध्ये रूपांतर केले जाईल. 450,000 चौरस मीटर क्षेत्रावर हे स्टेडियम बांधले आहे. हे मॉड्यूलर आकाराच्या डिझाइनमध्ये उभारले आहे. (डी झीन)
या स्टेडियमला आधी रास अबू अबद असे देण्यात येणार होते. मात्र, त्यानंतर त्याचे नाव 974 स्टेडियम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कतारचा आंतरराष्ट्रीय फोन डायल कोड देखील 974 आहे. 2017 मध्ये अनेक कंपन्यांनी मिळून हे स्टेडियम बांधण्याचे काम सुरू केले. ते 2021 मध्ये पूर्णत्वास गेले. यामध्ये वर्ल्डकप स्पर्धेतील 8 सामने खेळवले जाणार आहेत. तत्पूर्वी, त्यात 6 सामने खेळले गेले आहेत. (डी झीन)
कतारमध्ये जेव्हा वर्ल्डकपसाठी स्टेडियमचे बांधकाम सुरू झाले, तेव्हा त्यावरून बराच वाद झाला होता. कतारच्या स्टेडियमच्या बांधकामात 6500 मजुरांना जीव गमवावा लागला आहे, हे मजूर भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका आणि इतर देशांतून येथे आले होते, असे ब्रिटनचे वृत्तपत्र 'द गार्डियन'ने एक चौकशी अहवालात प्रकाशित केलं होतं. नंतर कतार सरकारने स्पष्ट केले की स्टेडियमच्या बांधकामात एकाही मजुराचा मृत्यू झाला नाही. मात्र, हे स्पष्टीकरण कोणीही मान्य केले नाही. यावरून मोठा वाद निर्माण झाला. आताही हा वादाचा विषय आहे. (डी झीन)
या स्टेडियमला 5 स्टार रेटिंग मिळाले असून ते पूर्णपणे वातानुकूलित आहे. यामध्ये मोठ्या ड्रेसिंग रूम आणि खेळाडूंसाठी खास लाउंजही आहेत. रंगीबेरंगी डब्यांच्या वापरामुळे त्याचा रंगच वेगळा दिसतो. (डी झीन)
या स्टेडियममध्ये 40,000 प्रेक्षक एकत्र बसून सामन्याचा आनंद घेऊ शकतात. त्यामुळे फिफा वर्ल्डकपसाठी हा टप्पा विशेष अभियांत्रिकी असलेल्या स्टेडियमसाठीही लक्षात राहील. त्यामुळे इतर देशही अशी स्टेडियम बनवण्याचे काम नक्कीच करू शकतात. (डी झीन)