वाल्मिकी रामायणात मंदोदरीची कथा नाही. पण मंदोदरीचे सौंदर्य आणि तिच्याविषयी अधिक माहिती उत्तर रामायणात सांगितले आहे. रामायणाच्या इतर अनेक आवृत्त्यांमध्येही मंदोदरीविषयी तपशीलवार लिहिलेले आहे. अद्भूत रामायणात मंदोदरीचे वर्णन सीतेची माता म्हणून केले आहे. याचीही एक कथा आहे. अद्भूत रामायणातील कथेनुसार रावण संतांचे रक्त एका मोठ्या कुंडात साठवत असे. (विकी कॉमन्स)
मंदोदरीला हा प्रकार कळताच तिला राग आला. रक्ताने भरलेल्या त्याच कुंडात बुडून मरायचे, असे तिने ठरवले. असे मानले जाते की, संतांच्या रक्ताने भरलेला तो कुंड इतर कोणत्याही विषापेक्षा जास्त विषारी होता. मंदोदरीने आत्महत्येच्या इराद्याने तलावात उडी मारली, पण मरण्याऐवजी ती गरोदर राहिली. याचं कारण होतं कुंडात सापडलेलं दूध. या रक्ताच्या कुंडात मिसळलेल्या दुधाच्या भांड्यालाही एका ऋषींनी आमंत्रित केलं होतं. (फाइल)
रामायणाची दुसरी आवृत्ती देवीभार्गव पुराणात नमूद आहे की, मंदोदरीच्या सौंदर्याने मोहित झालेल्या रावणाने जेव्हा तिच्याशी लग्न करण्याचा विचार केला, तेव्हा त्याला इशारा देण्यात आला होता की, या विवाहातून जन्मलेले पहिले अपत्य त्याच्या नाशाचे कारण असेल. रावणाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यानं मंदोदरीशीच लग्न केलं. नंतर तिच्या पोटी जन्मलेल्या पहिल्या अपत्याला स्वतः रावणाने कुरुक्षेत्रात जमिनीत गाडले. हे बालक सीता बनले आणि रावणाच्या मृत्यूचे कारण बनले. (विकी कॉमन्स)
"वासुदेव हिंदी" (Vasudevahindi) आणि उत्तर पुराण यांसारख्या रामायणाच्या जैन आवृत्त्यांचाही असाच संदर्भ आहे. त्यामध्ये असे सांगितले आहे की, सीता ही रावण आणि मंदोदरीची पहिली अपत्य होती आणि त्यामुळे रावणाला त्याच्या मृत्यूची भीती वाटल्यामुळे तिला पुरण्यात आले होते. इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड सारख्या आशियातील अनेक देशांमध्ये बोलली जाणारी भाषा - मलय भाषेत लिहिलेल्या रामायण "सेरी रामा" (Seri Rama) मध्ये देखील सीतेचे वर्णन त्याच प्रकारे दाखवलं आहे. "रामा केलिंग" (Rama Keling) देखील म्हणतात की, सीता ही रावणाची मुलगी होती. (विकी कॉमन्स)
"आनंद रामायण" नुसार, राजा पद्माक्षाला पद्मा नावाची मुलगी होती, ती देवी लक्ष्मीचा अवतार होती. तिचा विवाह सोहळा पार पडल्यावर राक्षस येऊन तिच्या वडिलांना मारतात. दु:खी झालेली पद्मा आगीत उडी घेते. रावणाला तिचे शरीर मिळते, जे 5 रत्नांमध्ये बदलले होते. तो तिला एका पेटीत बंद करून लंकेला घेऊन जातो. मंदोदरी पेटी उघडते आणि पाहते तर आत पद्मा असते.(विकी कॉमन्स)
मंदोदरी पती रावणाला ती पेटी आपल्यापासून दूर नेण्याचा सल्ला देते. दुसरीकडे, पद्मा रावणाला शाप देते की, ती पुन्हा लंकेत येईल आणि त्याच्या मृत्यूचे कारण होईल. घाबरलेल्या रावणाने पेटीला जनक नगरात गाडले, तर राजा जनक सीतेच्या रूपात पद्म प्राप्त करतो. (फाइल फोटो) (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)