धनु रास: धनु राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. गुरु अतिशय शुभ ग्रह मानला जातो. या ग्रहाच्या प्रभावामुळे धन आणि संपत्तीची प्राप्ती होते. धनु राशीवर ग्रहांची विशेष कृपा असल्यामुळे या राशीचे लोक भाग्यवान मानले जातात. हे लोक जे काम हातात घेतात त्यात त्यांना यश मिळतं. या राशीच्या मुली अतिशय नशिबवान असतात. त्यांना सासरी कशाचीच कमी भासत नाही.
कर्क रास: कर्क राशीचे मुली भाग्यवान मानल्या जातात. ज्या कामात हात घालतात त्या कामात सफल होतात. या राशीच्या मुलींचे नशीब फार बळकट असतं, त्यामुळे त्यांच्यासोबत कुटुंबाला सुख-समृद्धी प्राप्त होते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)