मेष : ज्योतिष शास्त्रानुसार शुक्राचा राशी बदल मेष राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. मेष राशीमध्ये भाग्य किंवा धनाच्या घरात शुक्राचे संक्रमण असल्यामुळे या राशीच्या लोकांची करिअरमध्ये अचानक प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना चांगल्या पदावर बढती मिळेल. व्यवसायात लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखकर राहील. घरात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात जे आनंददायी असतील.
वृश्चिक : ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांची राशी वृश्चिक आहे, त्यांच्यासाठी शुक्राचे संक्रमण लाभदायक ठरेल. शुक्र ग्रह वृश्चिक राशीच्या दुस-या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे या राशीच्या राशीच्या लोकांना सर्व सुखसोयी मिळतील तसेच विलासी गोष्टींचा आनंद घेता येईल. यावेळी कोणतीही नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
तूळ : ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांची राशी तूळ आहे, त्यांच्यासाठी शुक्राचा राशी बदल शुभ राहील. तूळ राशीच्या तिसऱ्या घरात शुक्राच्या प्रवेशामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल. ग्रहांच्या संक्रमणामुळे कौटुंबिक सुखात वाढ होईल. थांबलेले पैसे मिळतील. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल.