गजकेसरी योग 2023 मुळे 3 राशींना फायदा - मेष: तुमच्या राशीच्या लोकांना पैसा मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. तुमचे उत्पन्न वाढू शकते, नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमचा बॉसही खूप खूश असेल. सरकारकडून तुम्हाला लाभाच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात लाभ होईल.
मिथुन : गजकेसरी योगामुळे तुमची यश व कीर्ती वाढणार आहे. अचानक पैसा आणि धनलाभ होण्याचे योग आहेत. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन खरेदी करू शकता. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. धनलाभाचा काळ आहे, तुमची आर्थिक बाजू चांगली राहील. आवडीचे जेवण मिळेल. कोणत्याही नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. तुमचे काम पूर्ण होत राहील.
तूळ : तुमच्या राशीचे जे लोक व्यवसाय करतात, त्यांना गजकेसरी योगामुळे चांगला नफा मिळेल. नोकरीत यश मिळेल. तुमच्या जोडीदाराकडून काही चांगली बातमी मिळू शकते. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठीही काळ चांगला आहे. नोकरीत उच्च अधिकारी तुमच्यावर खुश राहतील, जे फायदेशीर ठरेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते.