हिंदू धर्मात काही चिन्हे अतिशय शुभ मानली जातात. धार्मिक मान्यतेनुसार, घराच्या मुख्य दरवाजावर ही चिन्हे लावल्याने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते.
स्वस्तिक चिन्ह यापैकी एक आहे. घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक लावणे खूप शुभ मानले जाते.
स्वस्तिक हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे. ज्यामध्ये सु म्हणजे शुभ आणि अस्ति म्हणजे असणे.
स्वस्तिकचा मूळ अर्थ शुभ, कल्याण असा आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक शुभ कार्यात स्वस्तिकचा वापर केला जातो.
हे गणपतीचे प्रतीक देखील मानले जाते. स्वस्तिकला भारतात काही ठिकाणी सतिया, असेही म्हणतात.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक लावणे खूप शुभ असते.
हळद किंवा कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढणे शुभ असते, असे वास्तुशास्त्राचे मत आहे.
घरात स्वस्तिक चिन्ह काढण्यासाठी तुम्ही घराच्या ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशेचा वापर करू शकता.
स्वस्तिक चिन्ह पूजेच्या ठिकाणी किंवा घराच्या मुख्य दरवाजावरही काढू शकता. यातून शुभ परिणाम प्राप्त होतात, असे मानले जाते.
हळदीने स्वस्तिक काढल्यानं घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो.
स्वस्तिकचे चिन्ह काढताना हे लक्षात ठेवले पाहिजे की ते 9 बोटे लांब आणि रुंद असावे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मिठाचे हे उपाय नकारात्मकतेला काढतात घराबाहेर
Click Here