भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी गणेश जयंतीला करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत, ज्याचा अवलंब करून आपण नोकरी, व्यवसाय, आरोग्य, घरगुती समस्या आणि मुलांशी संबंधित समस्यांपासून मुक्त होऊ शकता.
1. ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर येत्या गणेश जयंतीच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी. या उपायाने तुम्हाला फायदा होईल.
2. ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसांपासून अडकलेली महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूंचे दान करावे. याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते.
4. काही लोकांच्या जीवनात दीर्घकाळ समस्या/अडचणी राहिल्या असतील आणि तुम्ही त्यामुळे त्रस्त झाला असाल तर ज्योतिषशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नान करून गणेश मंदिरात जाऊन गणपतीला 11 किंवा 21 दुर्वांच्या तितक्याच पेंड्या अर्पण करा. या उपायाने तुम्हाला समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)