शनिच्या या वक्री स्थितीचा सर्व 12 राशींवर परिणाम पडेल. काही राशीच्या लोकांसाठी शनिची ही स्थिती खूपच शुभ आणि फलदायी ठरणार आहे. या लकी राशींविषयी जाणून घेऊ. काही राशींना वक्री शनी अमाप संपत्ती आणि समृद्धी देईल.
मेष - शनीची वक्री स्थिती मेष राशीच्या लोकांना जोरदार लाभ देईल. मालमत्तेत वाढ होईल. तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. आर्थिक बळ येईल. आत्तापर्यंतच्या जीवनातील समस्या आणि आव्हाने कमी होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. व्यावसायिक काहीतरी नवीन करतील आणि त्यात यशस्वीही होतील.
वृषभ - शनीच्या वक्री स्थितीमुळे वृषभ राशीच्या लोकांना इच्छित नोकरी मिळेल, ज्याची ते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. तुम्हाला उच्च पद मिळेल. उत्पन्न वाढेल, आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. बँक बॅलन्स वाढेल. जीवनात समृद्धी वाढेल. अविवाहितांना जोडीदार मिळेल.
मिथुन - शनीची वक्री स्थिती मिथुन राशीच्या लोकांना भाग्याची साथ देईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. परदेशात जाण्याचे मार्ग तयार होतील. आर्थिक लाभ होतील, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ आराम मिळेल. आदर वाढेल.
सिंह - शनीच्या वक्री स्थितीमुळे सिंह राशीच्या लोकांना अचानक भरपूर पैसा मिळू शकतो, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद मिळेल. राहणीमान चांगले राहील. यासोबतच तुमच्या रखडलेल्या योजनांना पुन्हा गती मिळू लागेल. व्यवसायात नवीन करार निश्चित होऊ शकतो.
मकर - मकर राशीचा स्वामी शनि असून शनीच्या वक्री स्थितीमुळे बँक बॅलन्स वाढेल. मालमत्तेतून लाभ होईल किंवा कोणतेही रखडलेले काम पूर्ण होऊ शकेल. कौटुंबिक सुखात वाढ होईल. जीवनात सुविधा वाढतील. पैशाची बचत करू शकाल.