Chandra Grahan 2022 : पुन्हा 3 वर्षांनी पाहायला मिळणार असं दृश्य; खास आहे आजचं चंद्रग्रहण
भारतासह अनेक देशांमध्ये आज चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतात हे चंद्रग्रहण संध्याकाळी 5.20 ते 6.20 या वेळेत दिसेल. आजच्या चंद्रग्रहणाच्या काही रंजक गोष्टी.
पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. या प्रक्रियेत एक वेळ अशी येते जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एकाच रेषेत येतात आणि सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडतो पण चंद्रापर्यंत पोहोचत नाही. या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात.
2/ 6
या चंद्रग्रहणाचे वर्णन शास्त्रज्ञांनी एक दुर्मिळ घटना म्हणून केले आहे. कारण यंदाच्या ग्रहण काळात चंद्र रक्तासारखा लाल दिसणार आहे. त्यामुळे याला 'ब्लड मून' असेही म्हटले जात आहे.
3/ 6
पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो, म्हणून तो इतरवेळीपेक्षा जास्त मोठा दिसतो. ग्रहणाच्या वेळी 'स्कॅटरिंग इफेक्ट' दिसून येतो, त्यामुळे चंद्राचा रंग लाल होतो.
4/ 6
चंद्रग्रहण भारतात चंद्रोदयाच्या वेळी दिसेल. ते दिल्लीत संध्याकाळी 5:31 वाजता, कोलकातामध्ये 4:54 वाजता, बेंगळुरूमध्ये 5:57 आणि मुंबईत 6:03 वाजता दिसण्यास सुरुवात होईल.
5/ 6
कॅनडा, ग्रीनलँड आणि रशियाच्या पूर्व भागात ब्लड मून स्पष्ट असेल. हे उत्तर अमेरिकेत देखील दिसेल. परंतु तेथील पश्चिमेकडील भागांमध्ये ते अगदी स्पष्ट दिसेल. तसेच ते आशिया, ऑस्ट्रेलिया आणि उर्वरित प्रशांत महासागरात सूर्यास्तानंतर दिसेल.
6/ 6
हे चंद्रग्रहण अनेक अर्थांनी खास आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, लोकांना अशा चंद्रग्रहणासाठी 2025 पर्यंत वाट पाहावी लागेल. कारण आता ते थेट तीन वर्षांनी होईल.