पुण्यात शिवरायांच्या अवमानप्रकरणी आज बंदची हाक देण्यात आली आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला
यासोबतच याच्याविरोधात डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला आहे
मोर्चाच्या मार्गावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. या मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे
या कालावधीत डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना वाहतूक विभागाच्या हद्दीतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल केले गेले आहेत