मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात एका १५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला तर एकाच कुटुंबातले पाच जण जखमी झाले आहेत.
कारमधून सहा जण प्रवास करत होते. अपघातानंतर आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग पोलीस आणि राणी एम्ब्युलन्सने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
अपघातात १५ वर्षीय सारा कुरेशी हिचा मृत्यू झाला. तर तीन पुरुष आणि दोन महिला अपघातात जखमी झाले आहेत. सर्वजण एकाच कुटुंबातले आहेत.