जेजुरीत सोमवती अमावस्येनिमित्त यात्रा भरली असून लाखो भाविक गडावर दाखल झाले आहेत. सोमवती अमावस्येला सर्वात मोठी यात्रा जेजुरीवर भरते. पालखीतून दुपारी देव कऱ्हा स्नानासाठी गेले. दुपारी साडे तीनच्या सुमारास देवाला कऱ्हा स्नान घालण्यात आले. पालखी सोहळ्यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते. सोमवती अमावस्येनिमित्त यात्रेत जेजुरी गडावर यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात भंडाऱ्याची उधळण करण्यात आली यात्रेच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे.