अक्षय्य तृतीयेचा दिवस सोनं खरेदीसाठी शुभ मानला जातो. या दिवशी सोन्याचे दर काय आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव रोज बदलतात. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी ताजा भाव माहिती असणे आवश्यक आहे.
पुण्यातील सोन्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथील दुकानांमध्ये दागिन्यांचे निरनिराळे ऑप्शन मिळतात. त्यामुळे ते खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्या सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे. पुण्यातील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
पुण्यात शुक्रवारी (21 एप्रिल) 24 कॅरेट सोन्याचा प्रती तोळा दर 62077 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 56901 रुपये प्रती तोळा इतका होता.
पुण्यात आज (21 एप्रिल) 24 कॅरेट सोन्याचा प्रती तोळा दर 61599 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54465 रुपये प्रती तोळा इतका आहे.
आज 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 6159 तर 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 5646 इतकी आहे. अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाल्यानं पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये ज्वेलरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.