सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज एबीव्हीपीच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं आहे. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यापीठामध्ये चित्रित झालेल्या रॅप साँगच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आलं आहे. आंदोलकांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून जोरदार घोषणाबाजी करत राडा केला त्यानंतर आंदोलकांकडून विद्यापीठाच्या दरवाजाच्या आणि खिडक्यांच्या काचाही फोडण्यात आल्या कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या या आंदोलनामुळे विद्यापीठात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं