घोडेगाव-जुन्नर रस्त्यावर गिरवली गावाच्या पुढे एका अवघड वळणावर एसटी बस क्रमांक एमएच 14 बीटी 1582 घसरली आणि गाडी कठडे तोडून पुलावरुन खाली कोसळली.
नुकताच पाऊस झाला असल्याने रस्ता निसरडा झाला होता. त्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे.
यामध्ये जखमी झालेल्या 35 प्रवाशांना घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, गिरवली गावचे सरपंच संतोष सैद आणि ग्रामस्थांनी खाजगी वाहने, रुग्णवाहिका यामध्ये घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात पोहचवलं.