मराठी बातम्या » फोटोगॅलरी » बातम्या » या मॉडेलला आहे साहसी Kayak Fishingची आवड, चालत्या बोटीतून करते मासेमारी

या मॉडेलला आहे साहसी Kayak Fishingची आवड, चालत्या बोटीतून करते मासेमारी

Fishing Queen Of Florida : जगात असे काही लोक आहेत, जे कोणत्याही परिस्थितीत त्यांचे छंद जोपासतात. अशाच लोकांपैकी एक आहे मॉडेल सारा स्नेडल (Sara Snedal). ती अमेरिकेतील (United States) फ्लोरिडाची रहिवासी आहे. तिला असा छंद आहे, जो सहसा पुरुषी समजला जातो. साराला समुद्रातील मोठेमोठे मासे आणि प्राणी पकडण्यात रस आहे. तिनं गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.