धकधक, हुरहुर आणि जल्लोश; असा रंगला ‘सूर नवा ध्यास नवा’ महाअंतिम सोहळा
सूर नवा ध्यास नवा: अहमदनगरची सन्मिता धापटे-शिंदे ठरली महाराष्ट्राची महागायिका
|
1/ 10
कलर्स मराठी वाहिनीवरील 'सूर नवा ध्यास नवा- आशा उद्याची' या रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा 13 जूनला रविवारी पार पडला. यात विजेता (winner of sur nava dhyas nava) कोण ठरणार याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं.
2/ 10
या सोहळ्यात सन्मिता धापटे-शिंदे (Sanmita Dhapte Shinde) हिने बाजी मारली असून तिनं महागायिका होण्याचा मान पटकावला आहे.
3/ 10
सहा गायिकांपैकी सन्मिता हिची महाराष्ट्राची महागायिका म्हणून निवड करण्यात आली आहे.
4/ 10
रश्मी मोघे, राधा खुडे, प्रज्ञा साने, संपदा माने आणि श्रीनिधी देशपांडे या उत्तम गायनकौशल्य असणाऱ्या स्पर्धकांवर मात करत सन्मितानं महागायिका होण्याचा मान पटकावला आहे.
5/ 10
कलर्स मराठीनंही आपल्या इन्स्टाग्राम पेजवरुन पोस्ट शेअर करत सन्मिताचं अभिनंदन केलं आहे.
6/ 10
महागायिका ‘सन्मिता धापटे-शिंदे' आहे महाराष्ट्राची 'आशा उद्याची'. तिचे मनःपूर्वक अभिनंदन! अशी पोस्ट वाहिनीनं शेअर केली आहे.
7/ 10
संपूर्ण देशभरातून अनेक स्पर्धकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. मात्र, त्यापैकी केवळ 16 स्पर्धकच आपल्या गायनाच्या कौशल्यामुळे महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचले.
8/ 10
'सूर नवा ध्यास नवा'चं हे चौथ पर्व होतं आणि ते अधिकच खास ठरलं कारण यात फक्त गायिकांचाच समावेश होता.
9/ 10
अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या सहा गायिकांमध्ये अहमदनगरची सन्मिता धापटे-शिंदे, डोंबिवलीची प्रज्ञा साने, बारामतीची राधा खुडे, पुण्याच्या श्रीनिधी देशपांडे आणि रश्मी मोघे तर कोल्हापूरची संपदा माने यांचा समावेश होता.
10/ 10
या सर्वांमध्येच अगदी अटीतटीची स्पर्धा होती. मात्र, अहमदनगरच्या सन्मिता धापटे-शिंदे हिनं महाराष्ट्राची महागायिका होण्याचा मान पटकावला.