पावसाळ्यात अनेकांना गालावर खाज येण्याची समस्या उद्भवते. ही खाज अतिशय त्रासदायक बनते आणि थांबण्याचे नाव घेत नाही.
कोणत्याही ऋतूत गालावर खाज येऊ शकते, परंतु पावसाळ्यात ही समस्या अधिक दिसून येते. त्याकडे दुर्लक्ष करणे अजिबात योग्य नाही.
सूर्यप्रकाशामुळे देखील गालावर सतत खाज येऊ शकते. त्यामुळे तुमची त्वचा संवेदनशील असेल तर गाल थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्या.
चुकीच्या स्किन केअर उत्पादनांचा वापर केल्याने गालावर खाज येते आणि अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे शक्यतो गालावर केमिकल उत्पादने वापरने टाळा किंवा तुमच्या त्वचेनुसार उत्पादने निवडा.
कधी-कधी चेहरा व्यवस्थित साफ न केल्यामुळे खाज येण्याची समस्या होऊ शकते. विशेषत: पुरुषांनी मोठी दाढी ठेवली आणि ती व्यवस्थित साफ केली नाही तर खाज सुटू लागते. चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेस वॉश वापरण्याचा प्रयत्न करा.
महिलांनी मेकअप काढण्यासाठी डायरेक्ट फेसवॉश वापरणे टाळावे. कारण मेक-अपचे छोटे कण त्वचेत घुसून संसर्ग होऊ शकतात. चेहरा धुण्याऐवजी तुम्ही गुलाबजल किंवा टोनर वापरू शकता.
गालावर खाज येणे हे सोरायसिससारख्या त्वचेच्या संसर्गाचे लक्षण असू शकते. अशा स्थितीत ताबडतोब डॉक्टरांना भेटा. कारण हा आजार टाळल्यास तो वाढू शकतो.
पित्त ही एक प्रकारची त्वचेची ऍलर्जी असते ज्यात त्वचेवर पुरळ उठतात आणि खाज सुटते. हा रोग काही दिवसात स्वतःच बरा होतोय परंतु अशी समस्या उद्भवल्यास डॉक्टरांना भेटा.
गालावर खाज येऊ नये म्हणून त्वचा हायड्रेट ठेवा. कोरड्या त्वचेमुळे देखील खाज येऊ शकते. त्वचा उत्पादने अत्यंत काळजीपूर्वक निवडा आणि मेकअप ब्रश नियमितपणे स्वच्छ करा.