कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील दीपिका आणि ऐश्वर्याच्या लुकची कौतुक तर होतय पण त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलही केलं जातय.
दीपिकाच्या गाऊनचं कौतुक झालं मात्र दीपिकाची हेअर स्टाइल काही चाहत्यांच्या पसंतीस उतरली नाही. हेअर स्टाइलवरुन दीपिकाला प्रचंड ट्रोल करण्यात आले.
कान्स फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी दीपिकाने ब्लॅक आऊटफिटवर घातलेल्या युनिक नेकपीसमुळे सर्वांचं लक्ष वेधलं.
यावेळी दीपिकाने न्यूड लिपस्टिक ब्लॅक नेलपेंट आणि बोल्ड आयलाइनरने लुक कंम्पलिट केला. पण तिच्या मेकअपने सर्वांचीच निराशा केली.
'काली बिल्ली लग रही हो' असं म्हणत दीपिकाला ट्रोल करण्यात आलं. 'लायनर थोडं कमीच झालं', असं काही युझर्सनी म्हटलेय, तर 'भारताचं नाव कानमध्ये जाऊन खराब केलंस', असं अनेकांनी म्हटलं आहे.
कान्स फेस्टिव्हलच्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्सवेळी दीपिकाने सब्यासाचा ब्युटीफूल आऊटफिट घातला होता. या आऊटफिटवर दीपिकाने कलरफुल नेकपिस घातला होता. ज्याने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या.
दीपिकाचा हा सिंपल वन पिस देखील सर्वांना आवडला. 'दीपिका माणसात आली' अशा कमेंट अनेकांनी तिच्या या फोटोवर केल्या आहे.