advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / चीनमध्ये भयंकर स्थिती; कोरोनाबाधित होतायत गायब अन् रेशन सुद्धा आलंय संपत

चीनमध्ये भयंकर स्थिती; कोरोनाबाधित होतायत गायब अन् रेशन सुद्धा आलंय संपत

Covid Cases in China: चीनमधील शांघायमध्ये एका दिवसात विक्रमी 8 हजार 581 रुग्णांची नोंद झाली आहेत. शांघायमध्ये संक्रमित लोक आता 'गायब' होत आहेत. इथं लोकांना वेगळं ठेवायला जागा उरलेली नाही. त्यामुळं त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जात आहे. (सर्व फोटो-AP)

01
कोरोना व्हायरसमुळे चीनमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. येथे 27 हून अधिक प्रांत कोरोना महामारीच्या विळख्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 412 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पहिल्या लाटेच्या शिखरापासून सर्वोच्च.

02
शांघायमध्ये एका दिवसात विक्रमी 8 हजार 581 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. देशातील अनेक प्रांतांमध्ये अतिशय धोकादायक ओमिक्रॉन प्रकार पसरला असून त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

03
परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, चीनच्या प्रशासनानं देशाची आर्थिक राजधानी शांघायमध्ये लॉकडाऊन (Lockdown in Shanghai) लागू केलं आहे. एवढंच नाही तर दोन कोटींहून अधिक नागरिकांच्या कोरोना तपासणीसाठी इथं कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. इथं लोकांना विनाकारण घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असेल तरच घरातून बाहेर पडता येतं.

04
शांघायमध्ये संक्रमित लोक आता 'गायब' होत आहेत. इथे लोकांना वेगळे ठेवायला जागा उरलेली नाही. त्यामुळं त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जात आहे. बाधितांना जबरदस्तीनं शांघायला लागून असलेल्या झेजियांग आणि जिआंगसू इथं पाठवलं जात आहे. प्रत्येक प्रांतात हजार-दोन हजार लोकांना पाठवले जात आहे.

05
सोमवारी शांघायमध्येही कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी मास टेस्टिंग करण्यात आली. येथील सर्व 2.6 कोटी लोकसंख्येची चाचणी घेण्यात आली. शांघायचे आरोग्य अधिकारी लोकांच्या न्यूक्लिक अॅसिड चाचण्या घेत आहेत. या चाचणीत चुकीचा निकाल लागण्याची शक्यता नगण्य आहे. कारण, थोडासाही कोविड संसर्ग असेल तरी यातून ते कळतं.

06
शहरात 28 मार्चपासून दोन टप्प्यातील लॉकडाऊन सुरू झाला. बाहेर पडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. एवढंच नव्हे तर, शहरातील आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. परदेशात निर्यात होणाऱ्या मालाचा पुरवठा बंद करण्यात आला आहे.

07
परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, शांघायमधील कोणत्याही रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यासाठी जागा उरलेली नाही. असं असूनही, चीनचा दावा आहे की, शांघायमध्ये आतापर्यंत एकाही व्यक्तीचा कोरोना संसर्गानं मृत्यू झालेला नाही.

08
चीनचे सैन्य पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या 2000 हून अधिक वैद्यकीय कर्मचार्‍यांना रविवारी शांघाय येथे कोरोना तपासणीत नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी पाठवण्यात आले. मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलंय की, जिआंगसू, झिंजियांग आणि बीजिंगसह अनेक प्रांतातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीही तिथं पाठवण्यात आले आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • कोरोना व्हायरसमुळे चीनमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. येथे 27 हून अधिक प्रांत कोरोना महामारीच्या विळख्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 412 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पहिल्या लाटेच्या शिखरापासून सर्वोच्च.

    MORE
    GALLERIES