स्वयंपाक घरातील मसाल्यांमध्ये महत्त्वपूर्ण असलेलं जीरे दररोज चिमुटभर सेवन केलं तर झपाट्याने वजन कमी होतं. हे कोलेस्ट्रॉल लवकर घटवतं.
जिऱ्यामध्ये असलेल्या 'मोलाटोनीन' तत्त्वामुळे डायरिया, एसीडिटी, पोट दुखी, पोटातील कृमी या समस्या दूर होतात. ज्या लोकांना अन्न पचनाचा त्रास होतो त्यांच्यासाठी तर जिरे वरदान आहे.
लोहाचं प्रमाण अधीक असल्यामुळे शरिरातील रक्ताचं प्रणाम वाढवण्यास जिरे लाभदायक आहे. जिरे अँटीसेप्टीक असून, त्यामुळे सर्दी आणि कफ होत नाही. मुळव्याधीसाठीही गुणकारी आहे जिरे.
जिऱ्यात व्हिटॅमिन ई चं प्रमाण अधीक असल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. जिरे सेवन केल्याने स्वाईन फ्लू आणि ताप कमी होतो.