कोरोना व्हायरसवर औषध शोधण्यासाठी सर्व जगभर प्रयत्न होत आहेत. मात्र त्यात अजुन यश आलेलं नाही.
2/ 6
जोपर्यंत औषध सापडत नाही तोपर्यंत काळजी घेण्याशीवाय पर्याय नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
3/ 6
औषधपेक्षाही मास्क हाच कोरोनापासून संरक्षण करू शकतो असा दावा अमेरिकेच्या Centers for Disease Control and Preventionचे संचालक डॉ. रॉबर्ट रेडफिल्ड यांनी केला आहे.
4/ 6
मास्क हा परिणामकारक असला तरी अमेरिकन लोक मास्क घालण्याचे टाळत आहेत. कोरोनाची साथ रोखायची असेल तर मास्क घाला असं आवाहनही त्यांनी केलं.
5/ 6
मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता ही कोरोनाला रोखण्याची त्रिसूत्री असल्याचंही त्यांनी सांगितलं.
6/ 6
मास्कचा वापर केला तर कोरोनाला रोखता येतं आणि कोरोनापासून संरक्षणही मिळते असा दावाही डॉ. रॉबर्ट रेडफिल्ड यांनी केला आहे.