दिल्लीजवळच्या गुरुग्राममधल्या एका रिक्षाचालकाच्या खून प्रकरणात पोलिसांना वेगळीच खळबळजनक माहिती समजली. या रिक्षाचालकाच्या प्रेयसीनेच त्याचा अत्यंत निर्दयपणे दगडाने ठेचून खून केल्याचं उघड झालं आहे.
गेल्या 3 वर्षांपासून मृत आसिफ आणि सोनिया यांच्या रिलेशनशिपमध्ये वाद सुरू होते. आसिफ मूळात उत्तर प्रदेशातल्या बदायूंचा रहिवासी असून गुरुग्राममध्ये तो ऑटो चालवत होता.
कुणीतरी रिक्षाचालकाला बेदम मारहाण करत असल्याची खबर मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण तो तरुण गंभीर अवस्थेत सापडला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
गुरुग्राम पोलिसांनी या खळबळजनक खून प्रकरणात हत्या झालेल्या मुलाची गर्लफ्रेंड सोनिया आणि तिचा मानलेला भाऊ याकूबला अटक केली आहे.
तिचा प्रियकर आसिफ त्याच्या पालकांच्या संमतीने लग्न करणार होता. त्यासाठी त्याने सोनियाला सोडायचा निर्णय घेतला होता. यावरून दोघांच्यात वाद झाला आणि तिने आपल्या प्रियकराचा खून केला.
गुरूग्राम पोलिसांनी या खून प्रकरणात वापरण्यात आलेल्या काठ्या आणि लोखंडी रॉड जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मारेकरी UP चे रहिवासी आहेत आणि गुरुग्राममध्ये राहून नोकरी करत होते.