advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / बायकोने दुसऱ्यांच्या घरात धुणी-भांडी करून शिकवलं; नवऱ्याने अधिकारी होताच दिलं सोडून!

बायकोने दुसऱ्यांच्या घरात धुणी-भांडी करून शिकवलं; नवऱ्याने अधिकारी होताच दिलं सोडून!

कमरू आणि ममता 6 वर्ष एकमेकांच्या प्रेमात होते. 2015 साली दोघांनी कोर्टात लग्न केलं. कमरू पदवीधर होता, मात्र तरीही बेरोजगारी त्याला सतावत होती. ममताने त्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला. त्याच्या शिक्षणाची जबाबदारी तिने आपल्या खांद्यावर घेतली. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. कमरू परीक्षा उत्तीर्ण झाला आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यात एक मोठं वादळ आलं...विवाहबाह्य संबंधांचं वादळ.

01
सध्या ज्योती मौर्य प्रकरण देशभरात चांगलंच गाजतंय. त्यानंतर आता अशाच अनेक दाम्पत्यांची अधुरी कहाणी जगासमोर येतेय. कमरू आणि ममताही त्यापैकीच एक. मध्यप्रदेशच्या देवास जिल्ह्यात हे दोघं गुण्यागोविंदाने नांदत होते. ममताने मोलमजुरी करून कमरूला शिकवलं. मात्र यशस्वी होताच त्याने ममताला दूर लोटून दुसरं लग्न केलं.

02
खरंतर ममताचं हे दुसरं लग्न होतं. 16 वर्षांपूर्वी तिचं पहिलं लग्न झालं. पदरात एक मुल असताना लग्नाच्या अडीच वर्षांनी तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. मुलाला ती एकटी सांभाळत होती, लहानचं मोठं करत होती. परंतु मुलाचं वय 15 वर्ष झाल्यानंतर तोसुद्धा देवाघरी गेला. अशात आता आयुष्य संपवावं, एवढाच मार्ग उरलाय, असं वाटत असताना ममताच्या आयुष्यात तिचा जोडीदार म्हणून तिच्या सासरचा नातेवाईक कमरू आला.

03
लग्नानंतर दोघांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. पदवीधर असूनही कमरू बेरोजगार होता. त्याला पुढे शिकायला सांगून ममताने त्याच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. आपण आतापर्यंत असं अनेकदा पाहिलं असेल की, आर्थिकदृष्ट्या बायकोची जबाबदारी नवरा घेतो किंवा दोघं मिळून खर्च सांभाळतात. मात्र नवऱ्याची आर्थिक जबाबदारी घेणाऱ्या बायका फार कमी असतात. ममताने आपल्या नवऱ्याला पुढे शिकता यावं यासाठी घरकाम करण्यास सुरुवात केली. अनेक घरांमध्ये जाऊन ती साफसफाई, धुणी-भांडी करू लागली. दुकानांमध्येही ती काम करत असे.

04
दिवस-रात्र एक करून ममताने नवऱ्याला शिकवलं, असं म्हणायला हरकत नाही. कमरूनेही मन लावून अभ्यास केला. 2019-20 साली त्याची व्यावसायिक कर अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. रतलाममध्ये त्याला नोकरी मिळाली. त्यामुळे त्याने ममताला माहेरी पाठवलं. आपला नवरा प्रामाणिकपणे नोकरी करतोय, असं ममताला वाटत होतं. मात्र इकडे त्याचं मन वेगळीकडेच भरकटलं होतं. विवाहबाह्य संबंध ठेवून तो प्रेयसीसोबत राहू लागला होता. त्याने प्रेयसीशी लग्नही केलं.

05
प्रकरण उघडकीस आल्यावर 2021च्या ऑगस्ट महिन्यात ममताने याविरोधात न्यायालयाकडे न्याय मागितला. सुनावणीदरम्यान कमरूने ममता त्याची पत्नी असल्याचं मान्य केलं. शिवाय तिच्यासोबत राहण्यासही होकार दिला. पत्नीला सोबत ठेवलं नाही तर, दरमहिना 12 हजार रुपये देण्याचंही त्याने मान्य केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ममताने ज्या जिद्दीने नवऱ्याला शिकवलं, त्याच जिद्दीने आता ती स्वतःच्या हक्कांसाठी लढतेय.

  • FIRST PUBLISHED :
  • सध्या ज्योती मौर्य प्रकरण देशभरात चांगलंच गाजतंय. त्यानंतर आता अशाच अनेक दाम्पत्यांची अधुरी कहाणी जगासमोर येतेय. कमरू आणि ममताही त्यापैकीच एक. मध्यप्रदेशच्या देवास जिल्ह्यात हे दोघं गुण्यागोविंदाने नांदत होते. ममताने मोलमजुरी करून कमरूला शिकवलं. मात्र यशस्वी होताच त्याने ममताला दूर लोटून दुसरं लग्न केलं.

    MORE
    GALLERIES