राजस्थानच्या जैसलमेरची जिल्हाधिकारी असलेल्या टीना डाबीची लहान बहीण रिया डाबी हिने गुपचूप लग्न उरकलं आहे. रिया डाबीने आयपीएस अधिकारी मनिष कुमार यांच्याशी एप्रिलमध्ये रजिस्टर पद्धतीने लग्न केलंय.
रिया डाबीसुद्धा आयएएस अधिकारी आहे. रिया आणि मनिष यांच्या लग्नाचा खुलासा गृह मंत्रालयाच्या नोटिफिकेशनमुळे झाला. रिया राजस्थान केडरची अधिकारी आहे तर मनीष हे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत.
गृह मंत्रालयाने सांगितलं की, महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी मनीष कुमार यांना राजस्थानला पाठवण्यात आलं आहे. आयएएस अधिकारी रिया डाबी राजस्थानमध्ये असून मनिष यांच्या बदलीसाठी दोघांच्या लग्नाचे कारण देण्यात आले आहे.
रिया डाबी आणि मनीष कुमार हे २०२१ च्या बॅचचे अधिकारी आहेत. रियाने २०२१ मध्ये युपीएससी परीक्षेत १५ वी रँक मिळवली होती. ती राजस्थानच्या अलवर जिल्ह्याची जिल्हाधिकारी आहे.
रिया डाबीची मोठी बहीण टीना डाबी २०१६मध्ये देशात युपीएससीत पहिली आली होती. २०१८ मध्ये आयएएस अधिकारी अतहर अहमदसोबत लग्नामुळे ती चर्चेत होती. अतहरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिने आयएएस अधिकारी प्रदीप गवांडे यांच्याशी लग्न केलं.