भारतात राष्ट्रपती पदासाठी अप्रत्यक्ष निवडणूक होते, ज्यामध्ये जनतेला मतदानाचा अधिकार नाही. यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे आणि राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य मतदान करतात. परंतु या सदनांतील नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदानादरम्यान कोणताही राजकीय पक्ष व्हिप जारी करू शकत नाही. (Image- @rashtrapatibhvn)