हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये मंगळवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला आणि पावसासह गारपिटीला सुरुवात झाली. त्यामुळं वातावरण आल्हाददायक झालं. उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर बर्फवृष्टीमुळे पर्यटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. गारपिटीमुळे रस्ता आणि जमिनीपासून ते घरांच्या छतापर्यंतही पांढरी चादर चढल्याचं दृश्य तयार झालं आहे. नजर जाईल तिथपर्यंत फक्त गारांची पांढरी चादर दिसते.