मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » मोठ्या अपघातातून सनी देओल बचावले; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

मोठ्या अपघातातून सनी देओल बचावले; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

सनी देओल भाजपकडून गुरूदासपूर या मतदरसंघातून प्रचार करत आहेत. प्रचारदरम्यान, गुरूदासपूर – अमृतसर नॅशन हायवेवर सोहल गावाजवळ सनी देओल यांच्या गाडीच्या ताफ्याला अपघात झाला. यावेळी तीन गाड्यांचं नुकसान झालं. तर, सनी देओल यांच्या गाडीचा टायर फुटला. समोरून येणाऱ्या गाडीला चुकवताना हा अपघात झाला. यामध्ये सर्व जण सुखरूप असून दुसऱ्या गाड्या बोलावून त्यानंतर सनी देओल प्रचारासाठी पुढे रवाना झाले.