भारताच्या नव्या गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आयएनएस मोरमुगाओची चाचणी यशस्वी झाली. आयएनएस मोरमुगाओने पहिल्या ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल फायरिंगवेळी लक्ष्य अचूक टिपलं.
ब्रह्मोस, बराक-८ यासारखी मिसाइल्स यावर आहेत. यात इस्रायलची रडार सिस्टिम एमएफ स्टार आहे. हवेत दूरवर असलेलं टार्गेटही यामुळे समजू शकतं.