ही आहे भारताची खास पाणबुडी INS वागशीर, जाणून घ्या हिच्या वैशिष्ट्यांबद्दल
भारतीय नौदलाचं (Indian Navy) सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टीनं आयएनएस वागशीर (INS Vagsheer) ही पाणबुडी महत्त्वाची ठरणार आहे. प्रोजेक्ट-75 अंतर्गत ही सहावी पाणबुडी 20 एप्रिलला समुद्रात उतरणार आहे. त्यात अतिशय अत्याधुनिक नेव्हिगेशन ट्रॅकिंग सिस्टिम बसवण्यात आल्या आहेत. हल्ला करण्यासाठी तसंच, शत्रूला चांगल्या प्रकारे प्रतिकार करता यावा यासाठी यात अनेक प्रकारची शस्त्रेही यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
|
1/ 5
भारतीय सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी आयएनएस वागशीर पाणबुडीमध्ये 40 टक्के भारतीय बनावटीची उपकरणं बसवण्यात आली आहेत. प्रक्षेपणानंतर या पाणबुडीची 12 महिने समुद्रात चाचणी घेतली जाईल. त्यानंतर तिला भारतीय नौदलात प्रवेश मिळू शकेल. (प्रतिकात्मक फोटो)
2/ 5
स्कॉर्पीन वाहन ही पाणबुडी कलावरी श्रेणीची डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. ती शत्रूची सहज दिशाभूल करू शकते. यात 18 टॉर्पेडो ठेवण्याची क्षमता आहे. याच्या मदतीने एकाच वेळी सहा टॉर्पेडो शत्रूवर डागता येतात.
3/ 5
ही पाणबुडी 50 दिवस पाण्यात राहू शकते. तिचं अंतर्गत तंत्रज्ञान फ्रेंच आणि स्पॅनिश कंपनीकडून विकत घेतले आहे.
4/ 5
भारताची लढाऊ क्षमता वाढवणारी ही या मालिकेतील शेवटची पाणबुडी आहे. यापूर्वी, प्रकल्प-75 अंतर्गत, भारताच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत 5 अत्याधुनिक पाणबुड्या तैनात करण्यात आल्या आहेत. (प्रतिकात्मक फोटो)
5/ 5
तिचं वैशिष्ट्य म्हणजे ही पाणबुडी स्कॉर्पीन वाहन ही कलावरी श्रेणीची डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी आहे आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. हिची निर्मिती भारतीय शैलीत करण्यात आली आहे.